*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुचले तसे लिहिले*
वेळ काळ आणि वय
कुणासाठी थांबले का?
ते थांबतही नाही
थांबणे हे त्यांना माहितच नाही
दिवसागणिक त्यांचे चक्र
चालूच राहते राहणार
जोपर्यंत जीव आहे देहात
तोपर्यंत देहाचे चक्रही चालते
म्हणूनच
जोपर्यंत देहात जीव आहे
स्वच्छंदी मनसोक्त मनमुरादपणे
आनंदी जीवन जगून घ्यावे
स्वतःला व इतरांनीही
आनंदात ठेवावे
अगदीच छोट्या छोट्या गोष्टीतही
आनंद शोधावा मानावा
आयुष्यात येणाऱ्या संकटरूपी
वादळाचाही आनंदाने सामना करावा
दुःखाला कवटाळून बसू नये
जीवनात कितीही दुःखाचे
डोंगर उभे राहोत
दुःख पचवण्याची ताकद असावी
दुःखलाही आनंदाच्या दारात
पाय ठेवतांना लाज वाटावी
जीवन खूप सुंदर आहे
आनंदाने जगून घ्या
वेळ काळ वय
कुणासाठी थांबले आहे का?
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
8208667477.
7588318543.
