*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्याची वजाबाकी*
कधी हिशोब केला नाही
हाती असलेल्या पैशाचा
काय कसा करणार हिशोब
आयुष्यातल्या अनुभवांचा? १
समोर आलेल्या प्रसंगांना
सामोरे गेले खूप धैर्याने
अनुभवांची शिदोरी घेऊन
लढत राहिले मी जिद्दीने.. २
भाग्य जरी बसलेले रुसून
हिंमत होती रगारगात
झाले गेले विसरून पुन्हा
पुढेच जायचे होते मनात ३
झाली जीवनाची संध्याकाळ
श्वास सूर्य आला उतरणीला
जीवनाचा गोड व्हावा अंत
हीच प्रार्थना दयाघनाला – ५
प्रतिभा पिटके
अमरावती

