You are currently viewing दत्तगुरु
Oplus_16908288

दत्तगुरु

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ मानसी जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दत्तगुरु*

 

दत्तनामाचा घोष चालला

चला जाऊया औंदुंबरी

अनुसयेच्या ओटीमध्ये

ब्रह्मा, विष्णु, महेश्वरी

 

गोजिरवाणी तीन बालके

फिरली अवतीभवती

अनुसूयेच्या भावभक्तीने

आचवली पदरी नाती

 

मार्गशीर्ष पुनवेच्या दिवशी

दत्तनाम त्रिमूर्ती मिळाले

रमा पार्वती, सरस्वतीला

पाहूनी भरते आले.

 

कशास घ्यावी परीक्षा इथे

शिव विष्णू भक्तांची

बालरूप त्रिमूर्ती पाहून

मती गुंगली देवींची

 

अनूसुयेची भक्ती पाहून

देवींचे ही मस्तक झुकले

हासत गाली त्रिदेवांना

बालरुप ही आवडले

 

भक्तीचे हे अतूट नाते

ह्रदयापासून जपलेले

देवांच्या इच्छेवर सतीने

बालकास घास भरवलेले

 

प्रा.मानसी जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा