You are currently viewing डास : एक मच्छर… भी!!
Oplus_16908288

डास : एक मच्छर… भी!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*डास : एक मच्छर… भी!!*

 

माझं मन मधूनच जाग होतं

जेव्हा मला डास चावतो

माझं रक्त पिणा-या डासांना

मी शोधायला निघतो ……!

एरवी मी निर्धास्त झोपून असतो

माझ्या मध्यमवर्गीय जगण्याला !मच्छरदाणीत स्वतःला कोंडून घेतो

 

काळजी मला माझ्या रक्ताची

घरांत कोंडून घेतलेल्या घरच्यांची

चादरीत अंग झाकून घेतो ..चिंता ती

फक्त रक्त पिणा-या डासांची ..!

 

माझ्या आयाबहिणींना विवस्त्र करून अत्याचार करणा-या सैतानांना

मी मोकळं सोडलं…त्या नराधमांचं

रक्त.. मी कां नाही ..सांडलं..गाडलं

इथे माझं ..घर पेटलयं …

आणि मी त्या डासाला शोधतोयं ..

 

तो बिचारा त्याच्या जगण्याकरता

चावतो..रक्त चोखतो

इथे माझं घर ..सैतांनानी लुटलं

अन् मी त्या ..डासाला शोधतो …

त्याच्या पासून वाचण्याकरता

मी माझ्या मच्छरदाणीत लपतो..!

 

माझ्या करता सीमेवर तो रक्त सांडतो

इथे मी त्या डरपोक डासाला घाबरतो .

तो मला रक्त जाळून खायला घालतो

अन् स्वतः आढ्याला जावून लटकतो

माझ्या देशबांधवांकरता एक रक्ताचा

थेंब डासाला देवू शकत नाही…!?

कितीकाळ असं चालणार..

 

आता डास चावला जरी मला

त्याला मी आता शोधत नाही

मच्छरदाणीतलं माझं जग अन् मी

तकलादू-आभासी – स्वार्थी…!!

त्यात माझं कुटुंब नाही!माझं कुणीच नाही!तिथे माझा मीच!कुणीच नाही

फक्त मीच आहे .!स्वार्थी मच्छर!!

एक मच्छर भी आदमीको हिजडा

बना देता है!अरे वह जीनेके लिए खून

पीता है….और तू….!!और..तू..!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा