यवतमाळ :
जलनायक मधुकर धस यांच्या कार्याचा वसा निरंतर चालू राहील.असे प्रतिपादन विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने दिल्या गेलेल्या विदर्भीय अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
साला बादाप्रमाणे महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील विशेषता सामाजिक क्षेत्रातील गुणवंत, कर्तृत्ववान अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीचा कार्यक्रम कै. मधुकर धस यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने 3 डिसेंबर 2025 रोजी दिलासा संस्था घाटंजी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून रमाकांत बापू, विजया धस, भूमिपुत्र वाघ, दत्ता पाटील, कोंढाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुरस्कर आयोजन सोहळ्याच्या संदर्भाने विजया धस सेक्रेटरी दिलासा संस्था यांनी महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल त्यांनी विशेष मांडणी केली.
भूमिपुत्र वाघ यांनी अवॉर्डची सुरुवात, अवॉर्डचे मूल्य आणि परंपरा या विषयावरती मांडणी केली. रमाकांत बापू यांनी अवॉर्ड संदर्भाने एकूणच पुरस्काराचे बदलत गेलेले स्वरूप या विषयावरती विचार व्यक्त केले विदर्भातल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणं,ऊर्जा देणं,आणि सामाजिक बदलाला पाठिंबा देणं ही आमची जबाबदारी आम्ही समजतो. या संदर्भात विचारपिठावरून त्यांनी आपले विचार मांडले.
त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून दत्ता पाटील यांनी सामाजिक चळवळी शांत होताना सध्या पाहत आहोत.इतके असले तरीही,महाराष्ट्र लोकविकास मंचनी सामाजिक बदलाच्या चळवळीला पुरस्कृत केले आहे.त्यांच्यातील निरंतरता ही वाखानण्याजोगी आहे.याचा आम्हा विदर्भवाशीयांना अभिमान वाटतो.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. भव्य समारंभात डॉ. मधुकर गुमळे, गुरुकुंज मोझरी यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, तर विजय बाबाराव कडू, चांदूर बाजार यांना विदर्भ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच बरोबर कै. प्रा. अविनाश शिर्के यवतमाळ यांना मरनोत्तर सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच पवनकुमार मिश्रा लाडेगांव, माधुरी खडसे डाखोरे राळेगाव, निरुपमा देशपांडे, मेळघाट, शीतल ठाकरे येरंडगाव, केशव गुरणुळे गडचिरोली, डॉ कविता बोरकर यवतमाळ, दुधराम ऊर्फ दिलीप बिसेन भंडारा, जिजा चांदेकर राठोड बुलढाणा यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पाणीदार संस्था म्हणून जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट वर्धा यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन रंजीत बोबडे, विजया धस, कोमल धस, बंडू आंबेडकर, संगीता गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पदाधिकारी विशेष उपस्थित होते. तर मधुकर धस, आणि विजया धस यांनी दत्तक घेतलेल्या मुली, नातवंडे, जावई असा मोठा परिवार सहभागी झाला होता.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक विजया धस आणि भूमिपुत्र वाघ यांनी केले तर आभार बंडू आंबटकर यांनी मानले.
