You are currently viewing तरुणावर बिबट्याचा हल्ला

तरुणावर बिबट्याचा हल्ला

तरुणावर बिबट्याचा हल्ला : मांगवली आयरेवाडी परिसरात भीतीचे सावट

वैभववाडी
मांगवली आयरेवाडी येथे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुलाजवळ बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. विजय अशोक आयरे असे जखमी तरुणाचे नाव असून तो विवाहित आहे.

या हल्ल्यात विजय आयरे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच वैभववाडी शहरातदेखील बिबट्या दिसून आला होता. कुत्र्याचा पाठलाग करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत वाढत असून नागरिक भयभीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा