*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्री गुरुदत्तांना वंदन!”*
श्री दत्त महाराजांना करूया वंदन
दिनांचे कैवारी चिंतिती कल्याण।।धृ।।
शीतल जल ज्यांची आवड असून
जोंधळ्याच्या कण्या कधी घेवडा भक्षून
भक्तकाजा करीता सदा जाती धावून।।1।।
नित्य भक्तगणांच्या संन्निध राहून
भक्त सुखी रहावा पहाती मनोमन
मुमुक्षूंना दत्त राहती आधार स्थान।।2।।
सर्वत्र संचार भक्त हृदयात रमुन
भक्तां कनवाळू दुष्टां कठोर वज्राहून
रोग मुक्ती करिती भेद-भाव विसरून।।3।।
भक्त भाव बघून नैवेद्य करी ग्रहण
संतोषती नुसत्या स्मरण नमस्कारानं
दत्त सांगती भक्तांस योगक्षेम चालवेन।।4।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड. महाराष्ट्र
पिन.410201.Cell.9373811677.
