You are currently viewing कविता

कविता

‌ *ज्येष्ठ लेखिका कवयित्री सामाजिक कार्यकर्ती आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कविता*

 

मी लिहिन कविता

कोणी वाचो वा न वाचो

मांडीन मी शब्द यज्ञ

देव भेटो वा न भेटो

 

 

माझे शब्द दुबळ्यांचे

अश्रू टिपून घेतील

माझे शब्द दु:खितांना

सूर सुखांचे देतील

 

 

माझे शब्द पेलतील

ऊन वादळाचा मारा

माझे शब्द झेलतील

धुंद पावसाच्या धारा

 

 

माझ्या कवितेमधून

फुले कळ्यांची होतील

माझ्या शब्दांच्यामधून

ढग आकार घेतील

 

कवयित्री

अनुपमा जाधव

डहाणू

प्रतिक्रिया व्यक्त करा