You are currently viewing ती आणि गजरा

ती आणि गजरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*‘ती आणि गजरा’*

 

तिला पाहिल्यावर

वाऱ्याला ही वाटतं थोडं थांबव

कारण तिच्या केसातला गजरा

सुगंधाची गाणी गातो

आसमंत सारा तिच्यासाठी हळवा होतो

 

ती हसली की

फुलांच्या पाकळ्या ही

अलगद उमलतात

तिच्या वेणीत माळलेला गजरा

किती नजरा पाहतात

 

गजरा तिच्या केसात गुंफला की

ती अधीक सुंदर दिसते

तिचं देखणं रूप पाहून

जणूकाही फुलांना उधाण येते

 

गजऱ्याला तिचा स्पर्श झाला की

गजरा ही आंनदान फुलतो

तिच्या मऊशार वेणीला

हळुवार मिठीत घेतो

 

खरतर गजऱ्यामुळेच

तिचं सौंदर्य खुलत

जणूकाही पहाटेच कोवळ चांदणं

तिच्या वेणीत उतरतं

 

तिचं गजऱ्यावर इतकं प्रेम की

तो फक्त तिच्यासाठी असतो

ती केसात माळते तेव्हा

तिच्या सौंदर्याला नवा अर्थ येतो

 

दोघांचं नातं म्हणजे

एकमेकांसाठी जगण्याच

पण मनाला भिडणारं

सुगंधाच कोमल‌ स्पर्शाच

 

खरचं तिच्याशिवाय गजरा पुर्ण होत नाही

गजऱ्याशिवाय ती सुंदर दिसत नाही

म्हणून गजरा माळताना ती हसते

कारण तिला माहीत असतं

सौंदर्याच अर्धवट तत्व

गजऱ्यामुळेच पुर्ण होते.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा