*आविष्कार रिसर्च कन्व्हेंशन २०२४/२५ ची आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला झोनल चॅम्पियनशिप*
वैभववाडी
मुंबई विद्यापीठ आयोजित अविष्कार रिसर्च कन्व्हेंशन २०२४/२५ या उपक्रमात वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला झोनल चॅम्पियनशिप मिळाली आहे. विविध संशोधन प्रकल्पांमधील प्रभावी कामगिरी, विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त सहभागिता आणि संशोधनउन्मुख शैक्षणिक वातावरण याच्या बळावर महाविद्यालयाने “झोनल चॅम्पियनशिप” हा मानाचा किताब पटकावला आहे.
दिनांक २९ नोव्हेंबर,२०२५ रोजी मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या शुभहस्ते हा गौरव महाविद्यालयाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. अर्जुन रावराणे आणि अविष्कार जिल्हा समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट यांनी स्वीकारला.
या प्रसंगी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, अविष्कारच्या OSD डॉ. मीनाक्षी गुरव, तसेच डॉ. शशिकुमार मेनन, डॉ. सुनिता शैलजान आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशामागे महाविद्यालयाच्या अविष्कार विभागातील, आविष्कार विभागाचे समन्वयक डॉ. डी. बी. शिरगावकर, सदस्य डॉ. व्ही. ए. पैठणे, प्रा. आर. बी. पाटील, डॉ. के. पी. पाटील आणि टीमचे विशेष मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन देत विविध श्रेणीतील संशोधन प्रकल्पांचे मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाम. विनोदजी तावडे साहेब, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
