You are currently viewing वायरी येथे उद्यापासून दत्तजयंती उत्सव

वायरी येथे उद्यापासून दत्तजयंती उत्सव

*वायरी येथे उद्यापासून दत्तजयंती उत्सव.*

*मालवण*

वायरी भूतनाथ येथील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या घरासमोरील दत्तस्थानावर दत्तजयंती उत्सव ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.सहस्र चंद्रयोगाचे औचित्य साधून ५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गायक जितेंद्र मेस्त्री (मुंबई) यांची भक्तीगीतांची सुरेल मैफील ‘झाली स्वामी कृपा झाली’होणार आहे.६ रोजी रात्री १० वाजता पडद्यावरील संगीत नाटक ‘मत्स्यगंधा’ होईल.रविवार,७ रोजी पडद्यावर संगीत नाटक ‘शारद्य’, ८ रोजी मराठी चित्रपट ‘दशावतार’ दाखविण्यात येणार आहे. लाभ घ्यावा,असे आवाहन प्रदीप वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा