*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परिघाची व्याप्ती*
परिघाच्या केंद्रबिंदूवर, घट्ट रोवावेत पाय न्युनगंड त्यागावा, सोडावी चिंता, ‘लोक म्हणतील काय’
शनै:शनै वाढवावी, त्रिज्या स्वकर्तृत्वाची
पंखात आणावी शक्ती, गगनभरारी घेण्याची
परिघाचा असू शकतो, लहान मोठा अवकाश
उंच झेप घेण्यासाठी, करावे मोकळे आकाश
अंथरूण पाहून पाय पसरावे, जुन्याची शिकवण
व्याप्ती वाढवावी अंथरुणाची, नव्या मनुचे कथन
निजकर्तृत्वाचा परिघ विस्तारत भिडवावा, पृथ्वीच्या परिघाला
बिंदू, त्रिज्या, व्यासाने घालावी, गवसणी आकाशाला
ध्येयाप्रती जगताना जीवनाचा,आनंदही घ्यावा
स्वतःसाठी स्वतःचा परीघ स्वतःच आखावा
परि स्वतःच आखलेल्या परिघाला, मानू नये बंधन
ते तर असते स्वातंत्र्याच्या, मर्यादेचे कुंपण
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
________________________
