शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक उत्साहात पार
सिंधुदुर्गातील कलाकारांसाठी नवी दिशा : प्रतिष्ठानच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
कुडाळ (सिंधुदुर्ग)
येथील श्री मारुती मंदिर सभागृहात शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानची सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाराम शेलार बुवा, सिंधुदुर्ग भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर, महाराष्ट्र पोलीस व मुंबई प्रतिष्ठान सदस्य श्री शंकर निवळे, सिनेनिर्माता-दिग्दर्शक व कार्यकारिणी सदस्य श्री विनोद शिंदे, भिवंडी तालुका अध्यक्ष श्री प्रकाश उतेकर, कार्यकारिणी सदस्य श्री बाबुराव निवळे, श्री दीपक शिंदकर यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी भूषवले. जिल्हा खजिनदार श्री राजेश पावसकर, श्री रामचंद्र परब बुवा, श्री दत्तप्रसाद खडपकर, श्री महेश वेंगुर्लेकर आणि सर्व पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात सिंधुदुर्गातील विविध कला, कलाकारांसाठी उपलब्ध व्यासपीठे, तसेच कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली. विभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यावेळी बुवा श्री सागर राठवड, बुवा श्री कृष्णा राऊळ, बुवा श्री अमित उमळकर, बुवा सौ. साची मुळम तसेच संस्थापक अध्यक्ष बुवा श्री राजाराम शेलार यांच्या भजन-गायन सादरीकरणामुळे कार्यक्रम संगीतमय झाला. सर्व मान्यवर, पदाधिकारी व कलाकारांचा सन्मान सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘कोकणचा बुलंद आवाज’ श्री राजाजी सामंत यांनी उत्कृष्ट शैलीत केले. तसेच मारुती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री मंदार शिरसाट आणि सहकाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.
भविष्यात कलाकारांसाठी राज्यभर अनेक योजना राबवून कार्यरत राहण्याची ग्वाही अध्यक्ष श्री राजाराम शेलार बुवा यांनी दिली. सर्व उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष श्री महेश सावंत यांनी मानले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक कलाकारांनी प्रतिष्ठानचे सभासद होण्याचे आवाहनही त्यांनी केले. 🙏🌹
