*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा. डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लावणी*
*शेज लावणी*
तुमच्या नावे किंमती अमानत
लुटा की राजा राती दौलत
ll ध्रु ll
यावे राजा मंचकी बसावे
तबक विडा जवळी घ्यावे
आतुरलेली शय्या लाजत
लुटा की राजा राती दौलत
ll 1 ll
चंद्र चांदणं अत्तर शिंपीत
जाई जुईची फुलवत रात
ज्योत पणती भिजती वात
लुटा की राजा राती दौलत
ll 2 ll
दरबार सजला शिश महाली
गालिचा झूम्बर कनात जाळी
साक्ष्यात लक्शुमी तुमच्या दारात
लुटा की राजा राती दौलत
ll 3 ll
शेज सजली चाफा फुलांची
गुलाब दाणी हीना अत्तराची
सुगंध दरवळे रात दरबारात
लुटा की राजा रातची दौलत
ll 4 ll
हिरवी कंचुकी मोर नाचरा
पैठणीतील पदर साजरा
उघडा कुपितील गंध लाजरा
नैवेद्याला हीच खिरापत
लुटा की राजा राती दौलत
ll 5 ll
प्रा डॉ प्रविण जी आर जोशी
ज्येष्ठ साहित्यिक
कॉपी राईट
