You are currently viewing अमोल दिघेंची अवघड सायकल मोहिम यशस्वी

अमोल दिघेंची अवघड सायकल मोहिम यशस्वी

निगडी प्राधिकरण :

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाकडून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित के टूके म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेसाठी व्हलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अमोल दिघे यांची महाराष्ट्रातून निवड झाली होती.

संपूर्ण देशभरातून आलेल्या हजारो अर्जामधून १५० जण पात्र ठरले होते. दिघे हे महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करणाऱ्या १२ जणांपैकी एक आहेत. १ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे ४००० किमी अंतर सहभागी सायकलस्वारांनी पार केले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्यां जयंतीनिमित्त खेलो इंडिया च्या आव्हानाला प्रतिसाद देत K2K – काश्मीर ते कन्याकुमारी असा तब्बल 4,000 किमी चा अविश्वसनीय सायकल प्रवास पूर्ण केला.

हा प्रवास काही साधा नव्हता.कडाक्याची थंडी, पाऊस,

जोरदार वारे,डोंगररांगा,प्रखर उन्हाळा,तसेच टायर खराब होणे,ट्युब फुटणे ,चाकांचे बेअरींग निकामी होणे या सारख्या अनंत प्रकारच्या अडचणी आल्या.

असं सर्व काही पार करत १६ दिवस दररोज २५०–३०० किमी सायकलिंग—हे सामान्यांच्या पलीकडचं, पराक्रमी मनाचं काम!

आज अमोल दिघे यांचा हा पराक्रम पाहताना एकच गोष्ट सिद्ध होते— प्रचंड इच्छाशक्ती, संयम आणि सातत्य असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नसते.

या के-टू-के सायकल रॅलीमध्ये देशभरातील १५० सायकलपटू सहभागी झाले होते.त्यांची दिसून येणारी अनेक वर्षांची शिस्त, तयारी व जिद्द यात शंकाच नाही.अमोल दिघेंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.आज प्रभु श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट,यमुनानगर ,निगडी पुणे व जेष्ठ नागरीक संघ यमुनानगर अध्यक्ष गजनान ढमाले यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा