You are currently viewing सावंतवाडीत भाजपाचा मेगापक्षप्रवेश; नगरपरिषदेतील विजयाची घोडदौड वेगवान

सावंतवाडीत भाजपाचा मेगापक्षप्रवेश; नगरपरिषदेतील विजयाची घोडदौड वेगवान

शेकडो सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार अधिक बळकट

 

सावंतवाडी :

आगामी नगरपरिषद निवडणुकीत बिहारमधील ऐतिहासिक विजयाप्रमाणेच सावंतवाडीतही भाजपाला मोठा विजय मिळेल, असा ठाम विश्वास भाजप युवा नेता विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. विविध पक्षांतील तसेच समाजातील शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत असून, या प्रवेशलाटेमुळे सावंतवाडी नगरपरिषदेत ‘कमळ’ फुलण्याचा निर्धार अधिकच बळकट झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शिवा गावडे आणि सामाजिक कार्यकर्ता संतोष तळवणेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत विशाल परब यांनी केले.

यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर पारधी, पूजा गावडे, श्याम सावंत, संचिता गावडे, सेजल पेडणेकर, संदीप नाईक, धीरज गावडे, खतिजा रेडकर, सिरिन बाडीवाले, आईसा रेडकर, रेहाना बाडीवाले, नुजार मुला, साईनाज मुला, साईद फिरझाडे, आयन शेख, जियान मेमन, आफताब शेख, फाद खाजा, मिझान मुला, मुस्तफा नासिपुरी, उभेद काझी, आरहन बाडीवाले, अफान बाडीवाले, रेहान शेख, प्राणिता सावंत, वैशाली राऊत, अर्पिता सावंत, मनीषा गावडे, कल्पना सावंत, मानसी राणे, अमिता रेमूळकर, कविता गंगावळकर, छाया कडू, संगीत पारधी, दिशा सावंत, आशा गावडे, भाग्यश्री भराडी, साक्षी तळवणेकर, शरद सावंत, सुहासिनी शेट्टे, सुमित्रा परब, साक्षी सावंत, लता गावडे, सोनाक्षी तेजम, यशश्री तळवणेकर, गौरेश गावडे, संगीता परब, जीवन कडू, सायली गावडे, सानिया तळवणेकर, मानसी पाटील, अंकिता सावंत, मनोहर पाटील, रंजना कारेकर, तृप्ती सावंत, लक्ष्मण भुते, निलया बदीरे आदींचा समावेश आहे.

या सर्वधर्मीय, विविध सामाजिक घटकांतील शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत सावंतवाडीत भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा