You are currently viewing कणकवलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
Oplus_16908288

कणकवलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश

कणकवली : कणकवली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवली येथे शिंदे शिवसेनेत प्रवेश करत राजकीय भूकंप घडवून आणला आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. नव्या प्रवेशकांचे आमदार राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी पक्षाचे निखिल गोवेकर, आदिनाथ चव्हाण, श्रीधर सावंत, मेहबुब लदाफ, हर्ष पाताडे, हर्षद पवार, भावेश चव्हाण, अमोल भोगटे आणि मनीष सावंत यांनी शिंदे शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहल धुमाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा