श्रद्धा भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली रुजूल पाटणकर व नीलम नाईक यांचा घराघरात प्रचार; भाजपच्या सत्तेमुळे विकासाला वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त
सावंतवाडी :
सावंतवाडी प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचे उमेदवार रुजूल पाटणकर आणि नीलम नाईक यांनी आपल्या प्रचाराला वेग देत घराघरात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विकास हा केंद्रबिंदू ठेवून मतदारांशी संवाद साधत असल्याने स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दोन्ही उमेदवारांनी सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात प्रचारयात्रा काढण्यात आली. यावेळी पाटणकर व नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच येणाऱ्या काळातील विकास आराखड्यावर चर्चा केली.
“केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आपल्या प्रभागाला अधिकाधिक विकासकामांचा लाभ मिळणार आहे. विजय निश्चित असून जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे,” असे प्रतिपादन उमेदवार श्रद्धा भोसले यांनी केले.
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, परिमल नाईक, ऋचा पाटणकर, बाबा कल्याणकर, बाळू शिरसाठ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते.
