सावंतवाडी :
सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. समर्थकांसह त्यांनी शहर पिंजून काढण्यास सुरुवात केली असून प्रत्येक गल्लीबोळात भेटीगाठी घेत मतदारांशी संवाद साधला जात आहे.
त्यांच्या या प्रचारयात्रेत अवधूत नाटेकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, व्यंकटेश शेट, विनिता नाटेकर, एलिडा डिसोजा, शीतल डिसोजा आदींचा सक्रिय सहभाग होता.
लोकांच्या भेटीत समस्या जाणून घेत आहोत आणि त्या सोडवण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे, असे कोरगावकर यांनी सांगितले. प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जनता माझ्यासोबत असून माझा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
