You are currently viewing काव्यात्मा साहित्य परिषद पुणे चे २०२५ चे पुरस्कार जाहीर 
Oplus_16908288

काव्यात्मा साहित्य परिषद पुणे चे २०२५ चे पुरस्कार जाहीर 

पुणे :

पिंपळे गुरव -काव्यात्मा साहित्य परिषद चे संस्थापक अध्यक्ष मा.कवी आत्माराम हारे आणि उपाध्यक्ष मा.संजय साळुंखे यांनी २०२५चे पुरस्कार जाहीर केले.

ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ कवी, पत्रकार मा.बाबू डिसोजा यांना काव्यात्मा साहित्य सेवा पुरस्कार, दीपक अमोलिक यांना काव्यात्मा शब्द सारथी सेवा पुरस्कार,बाबाजी मगदूम यांना काव्यात्मा आनंद भक्ती सेवा पुरस्कार, अमित केदारी यांना काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले.

पिंपळे गुरव येथे होणाऱ्या मराठवाडा जनविकास संघाचे ठिकाणी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे चे अध्यक्ष मा. पुरूषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रसिध्द कवी मा.राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात अप्पा कसबेकर, संदीप तापकीर, मदन देगावकर आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्ताने निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा