*सैनिक स्कूल, आंबोलीचा कॅ. अर्णव काळगे ‘तायक्वांदो’ स्पर्धेत राज्यात चौथा..*
आंबोली :
शिर्डी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘तायक्वांदो’ स्पर्धेत कॅ. अर्णव काळगे या खेळाडूने राज्यात चौथा येण्याचा मान मिळवला.
‘तायक्वांदो’ ही एक पारंपरिक कोरियन मार्शल आर्ट आहे. हा खेळ 206 देशात खेळला जातो. हा खेळ शारीरिक लढाई कौशल्य शिकवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या स्पर्धेत कॅ. अर्णव हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्याची निवड राज्य स्पर्धेसाठी झाली होती.
शिर्डी येथे ‘तायक्वांदो’ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अतिशय चुरशीच्या खेळानंतर कॅ. अर्णव काळगे हा या स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या खेळासाठी श्री.अविराज खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी अर्णवचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुनिल राऊळ, सचिव श्री. जाॅय डाॅन्टस, सर्व संचालक मंडळ,कार्यालयीन सचिव श्री.दिपक राऊळ व प्राचार्य श्री. नितीन गावडे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या.
