मागील वर्षी कोरोना महामारीने जगभर हैदोस घातला होता. यानंतर आता कुठेतरी कोरोना नियंत्रित येत होता. कोरोनाग्रस्तांची संख्याही कमी प्रमाणात असून कोरोनाची लागणसुद्धा कमी प्रमाणात होत होती. त्यामुळे सरकारने हळूहळू सर्व दरवाजे उघडे करायला सुरूवात केली होती.
मात्र पुन्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील आणि मुंबईतील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याचं राजेश टोपे म्हणाले.