हॉस्पिटल साठी काहीतरी करा निवडणुकीपूर्ती जनतेची दिशाभूल नको येथे प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा -रवी जाधव.
सावंतवाडी:
मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल संदर्भात 2019 चा शासन आदेश आहे. तेव्हाच टाऊन प्लानिंग डिपार्टमेंट ने सावंतवाडी शहरात जागा आरक्षित केली. शासनाने बजेट प्रोव्हिजन केली. जागा आहे निधी आहे; तरीही मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल झाले नाही. त्यामुळे झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी उपस्थित केला.
शासनाने 2018 मध्ये शासन आदेश काढून मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल साठी बजेट प्रोव्हिजन केली. शासनाकडे निधी होता. फक्त जागेचा विषय होता, असे भासविण्यात आले. प्रत्यक्षात 2019 मध्येच शासनाने नोटिफिकेशन काढून शहरातील जागा मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल साठी आरक्षित केली. त्यामुळे अन्यत्र जागेची शोधा शोध करण्याचा खरे तर प्रश्न नव्हता. कारण शासनाने याच उद्देशा साठी आरक्षित केलेली जागा असतांना निधी असतांना काम वेगाने सर्व सुरु होणे अपेक्षित होते. मात्र जागा नाही असा नाहक घोळ घालण्यात आला. जसे मळगाव टमिँनसचे करण्यात आले तसे. स्थानिक आमदार व जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष या नेतेमंडळींनी त्यावेळी एकमेकांना तीव्र विरोध केला. मडुरा कि सावंतवाडी या वादात विकास काम ठप्प झाले आणि सावंतवाडीकरांचे त्यात अतोनात नुकसान झाले.आता मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक एकमेकांच्या गळयात गळे घालून सावंतवाडी नगरपालिकेच्या प्रचारात उतरलेत.
ते आता एकत्र आले असले तरी सावंतवाडीकरांचे जे व्हायचे तेवढे नुकसान झालेच ना?
आता एकत्र आल्या नंतर तरी मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र ती पण फोल ठरली. जनतेची दिशाभूल करणारे तत्कालीन सत्ताधारी पुन्हा मते मागण्यासाठी येणार तेव्हा त्यांनी याचा सावंतवाडीकरांना हिशोब द्यावा आणि मगच मते मागावीत.
