You are currently viewing माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा उद्या मालवणात मेळावा

माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा उद्या मालवणात मेळावा

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा मेळावा रविवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेची जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
टोपीवाला हायस्कुलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गजानन नानचे, बी. बी. चव्हाण, शर्मिला गावकर, रुपेश खोबरेकर, गजानन मांजरेकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील शिक्षकेतर बांधवाना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी तसेच दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण, उच्च शिक्षण पदवी प्राप्त तसेच शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रत्येक तालुक्यातून एक लिपिक व एक चतुर्थश्रेणी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करून पुरस्कार देण्यात येणार आहे. संघटनेच्या सुरुवातीला ज्या शिक्षकेतर बांधवांनी संघटनेत आपले महत्वपूर्ण योगदान दिले, अशांचाही विशेष गौरव यावेळी करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आरवली सोनसुरे संस्थेचे आजोबा क्षेत्राधिकारी यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोळी महासंघाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष सतीश नाडगौड, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. डगरे, अध्यापक संघाचे माजी सचिव उमेश सुकी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष आनंद लोके, रेडी ग्रामपंचायत सदस्य गायत्री सातोस्कर यांच्यासह अनिल राणे, सुहास देसाई, गोपाळ चौकेकर, बी. बी. चव्हाण, प्रदीप सावंत आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा