कणकवलीत युवांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
कणकवली
कणकवली येथे शुक्रवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात शहर विकास आघाडीच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत निखिल गोवेकर, एव्ही चव्हाण आणि कणकवली शहरातील विविध युवकांनी महिंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी आमदार नीलेश राणे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना पक्षाच्या भूमिका आणि विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमाला उपनेते संजय आग्रे, माजी आमदार राजन तेली, पिंटू पटेल, महिंद्र सावंत, शेखर राणे यांची उपस्थिती लाभली.
नव्या युवकांच्या प्रवेशामुळे कणकवलीतील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
