You are currently viewing सावंत पितापुत्रांचा दातृत्वाचा मोठा हात

सावंत पितापुत्रांचा दातृत्वाचा मोठा हात

सावंत पितापुत्रांचा दातृत्वाचा मोठा हात : तरंदळे शाळेच्या तीन वर्गखोल्या सुशोभित

तरंदळे (प्रतिनिधी) :

तरंदळे जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे माजी विद्यार्थी प्रसाद शिवाजी सावंत आणि त्यांचे पुत्र विनय प्रसाद सावंत यांनी शाळेच्या तीन वर्गखोल्यांना तसेच हॅन्ड वॉश स्टेशनला स्वखर्चाने फरशी बसवून दिली. तसेच प्रार्थना हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी प्रतिमा बसविण्यात आली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुशील कदम यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेच्या पायाभूत सोयींमध्ये सकारात्मक बदल होणार असल्याचे केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी सांगितले. सावंत पितापुत्रांनी पुढेही शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा