*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹स्वप्नसत्य🌹
स्वप्नातील राजकुमारा सत्यात कधी तू येशील कां रे?
सत्यात येऊन स्वप्न तू माझे होशील कां रे?
प्रत्येक मुलींचे असे हेच स्वप्न जीवनसाथी मिळण्याआधी
तसेच होते माझेही, पूर्णत्वास
न्यायचे होते देवाच्या मनी,
पित्याने शोधियला ऐसा वर
लाडक्या लेकीसाठी
नसे मोह पैशाचा, सद्वर्तनी, सद्गुण, सत्कर्माचा धनी.
/१/
राजबिंडे , रुप देखणे, नीलनेत्र
गौरवर्ण,सोनेरी कुरळकेश
असे राजस निर्व्यसनी, मर्दानी मोहक व्यक्तीमत्वाचे भाग्य,
माझ्या नशीबी,मातपित्यांची
ही पुण्याई,आली माझ्या पदरी
स्वर्गात बांधली रेशीमगाठ ही लाखात मिळाले हे सौभाग्य.
/२/
संसार रथाची आम्ही दोन्ही चाके, सतत चाललो
एकोप्याने, सामंजस्याने,प्रेमाने परिस्थिती वर मात करोनि,
कधी सुखाचे, कधी दु:खाचे
कधी कष्टाचे क्षण आले गेले
तरी धैर्याने, एकजुटीने कार्यरत
संसारात एकरुप होऊनी.
/३/
दोन्ही सुंदर, गुणी कन्यांना
संस्काराचे दिधले खतपाणी
त्यांना वाढवता साथ ठेविली
एकत्र दोघांनी, एकमतानी,
कधी न अडले ,आमचे घोडे
संसार पथावर जीवनरथी
कलागुण, सद् बुद्धीने संगतीत
राहिलो, आनंदी समाधानी.
/४/
नशीबाने मिळाला जीवनसाथी
किती थोरवी त्यांची गावी
स्वप्नच माझे सत्यात अवतरले
की, सत्य सुंदरस्वप्नात उमलले,
काही कळेना माझे मजला
मानव रुपे जणू देव अवतरला
देवाला झाकावे, अन ह्यांना पहावे,या संभ्रमात मीचहरवले.
/५/
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
