You are currently viewing अपेक्षा.. अपेक्षा….
Oplus_16908288

अपेक्षा.. अपेक्षा….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अपेक्षा.. अपेक्षा….*

 

अपेक्षांची खाई… म्हणजे जीवन आहे

आशा दुजे ते नाव मनु आशेवरती राहे…

 

जर का नसेल आशा जर नसेल हो अपेक्षा

साऱ्याच संकुचित होतील जीवन कक्षा

गुलबकावलीचे फूल ते नित्यच झुलवत राहे…

अपेक्षांची खाई…

 

आशेवर चाले माणूस, जरी सुटतो त्याचा धीर

मनी नाही अपेक्षाच,नाही कोणताच वीर

सीमेवर लढता लढता जगण्याचे स्वप्न पाहे..

अपेक्षांची खाई…

 

झाला जरी हो भंग, तरी जिद्द ही सुटत नाही

तो आशेवरती वृद्ध जगण्याचे स्वप्न पाही

हो, जिथे तिथे अपेक्षा ही वेल बहरली आहे…

अपेक्षांची खाई…

 

जरी आले अपयश माणूस हटत नाही

ही अपेक्षाच त्याला आशा ही झुलवत राही

जरी झाला अपेक्षाभंग माणूस तो झटतच राहे…

अपेक्षांची खाई…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा