*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गारूड निरवतेचे*
〰️〰️〰️〰️〰️
ढळता मंगल तिन्हीसांजा
येते धावत अधीर यामिनी
मनांतराला सुखवित जाते
निरवतेचे ते गारूड गगनी
एकांतातील स्पर्श आठवांचे
अव्यक्तातून गाती विरहिणी
भाव अंतरी प्रीती व्याकुळी
स्वरसुरात गुणगुणती गाणी
मिटता वादळ हे मनांतरीचे
प्रीतभावना उचंबळती मनी
अंतर्मुख! होताना मनोमनी
गाज सांत्वनी ती येते कानी
ब्रह्मांडाचे पावन दर्शन होता
आत्मा हा जातो मोदे तृप्तूनी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि . ग.सातपुते.(भावकवी)*
*📞( 9766544908)*
