कुडाळ तालुक्यातील गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचण्यासाठी शिबिराचे आयोजन करा! – – – शिवसेना संपर्क प्रमुख अतुल बंगे!
नुतन तहसीलदार सचिन पाटील यांचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने केले स्वागत!
कुडाळ (प्रतिनिधी)
आतापर्यंत कुडाळ तहसीलदारांनी गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचवण्यासाठी महसुलची यंत्रणेचे सहकार्य देऊन योजना प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी कुडाळ नुतन तहसीलदार श्री सचिन पाटील यांच्याकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख श्री अतुल बंगे यांनी केली
कुडाळ नुतन तहसीलदार श्री सचिन पाटील यांचे आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क प्रमुख श्री बंगे यांनी स्वागत केले
यावेळी बोलताना श्री बंगे म्हणाले कुडाळ तालुक्याला गेल्या तीस वर्षांत चांगले काम करणारे तहसीलदार होऊन गेले त्याच पध्दतीने आपले काम असेल असे श्री बंगे यांनी सांगुन गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचण्यासाठी आपली महसुल यंत्रणा कायमच सहकार्य करते त्याच पध्दतीने या पुढच्या काळात आपणही असे उपक्रम राबवावेत असे सांगुन संजय गांधी निराधार योजना लाभार्थी सुध्दा ग्रामीण भागात लाभा पासुन वंचित रहाता नये यासाठी तहसीलदार म्हणून प्रयत्न व्हावेत असेही श्री बंगे यांनी सांगितले यावेळी तहसीलदार श्री पाटील यांनी सर्वांच्या सहकार्यातून आपण काम करुया असे सांगितले यावेळी मा आमदार वैभव नाईक यांचे स्विय्य सहाय्यक तथा आंबडपाल उपसरपंच श्री धिरेंद्र चव्हाण उपस्थित होते
