*समाज विकास संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्यात 28 वर्षात 47 हजार 215 झाडे लावणे आणि वाढविणेचा विक्रम*
*एक लाख झाडे लावण्याचे भूमिपुत्र वाघ यांचे स्वप्न*
धाराशिव :
समाज विकास संस्थेच्या वतीने 1997-98 पासून ते 2025 या 27 वर्षामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब, उमरगा, लोहारा या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या किमान शाळा,भूकंपग्रस्त भागातील पुनर्वशीत नाईचाकूर, नारंगवाडी, मातोळा, कदेर परिसरातील तांडे तर लोहारा तालुक्यातील देवबेट धानोरी, ब्रह्मपुरी अशा विविध गावातून आत्तापर्यंत 47 हजार 215 झाडे लागवड आणि संवर्धनाचे काम केलेलं आहे.
भविष्य काळामध्ये एक लाख झाडे लावण्याचे स्वप्न समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, आणि अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ, संस्थापिका गरीबाची, अनाथाची माय विद्याताई वाघ,यांचे स्वप्न असल्याचे पत्रकारांना बोलताना व्यक्त केले.
गेल्या दहा दिवसांमध्ये देवबेट देवी मंदिर धानोरी या देवस्थानच्या परिसरामध्ये 3000 झाडे लावून संवर्धनाचे काम सुरू केलेले आहे. याप्रसंगी भूमिपुत्र वाघ यांनी झाडाचे महत्व, ऑक्सिजन, निसर्ग संवर्धन, निसर्ग रक्षण, आणि तापत चाललेलं मराठवाड्यातील ऊन रोखायचं असेल तर वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आपल्याला जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत लागणारा हजारो टन ऑक्सिजन हा आपण स्वतः आपल्यासाठी निर्माण करणे गरजेचे आहे. तर मृत्यू समयी लागणार एक टनभर लाकडं याची प्रत्येक माणसाने स्वतःची सोय स्वतः करून ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. तरच हा निसर्ग टिकणार आहे.अन्यथा ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून माणसं,प्राणी,पक्षी पृथ्वीवरील जीव नष्ट होतील. कदाचित भविष्यामध्ये कोविड सारखी एखादी महामारी येईल, तेंव्हा तोंड देणे मुश्किल होईल. भविष्यकाळाच्या पाऊल खुणा आजच शोधून चालायला लागनं अत्यंत योग्यतेचं होईल. त्यासाठी आजच वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या मागे प्रत्येक माणसाने लागावं. असे आवाहन भूमिपुत्र वाघ,यांनी तुगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्ष दिंडी काढून विद्यार्थ्यांच्या समोर व्यक्त केले.
गेली दहा दिवस वृक्ष लागवडीचा महोत्सव घेत असताना धानोरी जिल्हा परिषदेचे शिक्षक, गावातील जेष्ठ नागरिक समाजसेवक, देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, आणि विद्यार्थी, मॉर्निंग वॉक उमरगाचे पदाधिकारी, महिला राजसत्ता आंदोलनाच्या कार्यकर्त्या, महिला अत्याचार विरोधी महाअभियानाच्या कार्यकर्त्या त्यासोबत महात्मा बसवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जेवळीचे शिक्षक, शिक्षण समितीचे पदाधिकारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या सर्वांच्या सहभागातून हे वृक्ष लागवडीचे काम मिळून पूर्ण केल्याचे समाधान भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण 28 वर्षांमध्ये सामाजिक वनीकरण धाराशिव, चेल्लाराम फाउंडेशन मुंबई, आरएसबी फाउंडेशन पुणे, टी डी एस एस पुणे, यांनी मदत केलेली आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी मदत करणाऱ्या संस्थांचे धन्यवाद व्यक्त केली आहेत.
