मराठी व उर्दू शाळाच्या शनिवारच्या वेळेत बदल…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यतील मराठी व उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शासन मान्य मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यम अनुदानित, विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा शाळांच्या शनिवारच्या शाळेच्या वेळेत सकाळी ७.२० ते ११.५५ ऐवजी सकाळी ७.२० ते ११.३० असा बदल करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे.
हा बदल १८ नोव्हेंबर पासून, शनिवार तासिका नियोजन पुढीलप्रामणे, तास, कंसात वेळ, परिपाठ (७.२० ते ७.३०), १ ला तास ( ७.३० ते ८.५), २ रा तास (8.05 ते 8.40),3 रा तास( 8.40 ते 9.15),4 था तास (9.15 ते 9.50), मधली सुट्टी (9.50 ते 10.20), 5 वा तास (10.20 ते 10.55), 6 वा तास (10.55 ते 11.30) असा बदल आहे.
