You are currently viewing सावंतवाडी प्रभाग ६ मध्ये भाजपा उमेदवार अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांचा गणेश पूजनाने प्रचाराचा प्रारंभ

सावंतवाडी प्रभाग ६ मध्ये भाजपा उमेदवार अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांचा गणेश पूजनाने प्रचाराचा प्रारंभ

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ चे भाजप उमेदवार अमित गवंडळकर आणि मेघा दुबळे यांनी आज गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराची मंगल सुरुवात केली. शुभारंभाच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित गवंडळकर यांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

“एका साध्या कार्यकर्त्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन संवाद साधणार आहे. मतदारांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त मतांनी विजय मिळवण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद लावणार आहे,” असे गवंडळकर म्हणाले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुधीर आडिवरेकर यांनीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. “सेवेची संधी दिल्यास प्रामाणिकपणे काम करण्याची आमची बांधिलकी आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा