You are currently viewing अखेर कणकवलीत डीपी रस्त्यासमोर मिडल कट

अखेर कणकवलीत डीपी रस्त्यासमोर मिडल कट

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश

कणकवली
शहरातील महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत फ्लाय ओव्हर खालील सर्विस रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांना मिडल कट ठेवण्याची सूचना यापूर्वी नगराध्यक्ष यांच्याकडून देण्यात आली होती. मात्र नरडवे रोड, पटवर्धन चौक, भालचंद्र महाराज संस्थान रोड या ठिकाणी वगळता डीपी रोड समोर मिडल कट न ठेवताच लोखंडी बॅरिकेट लावण्यात आली होती. त्या वेळी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी तेथील काम बंद पडत डीपी रोड समोर मिडल कट ठेवण्याची सूचना दिली होती. त्यानंतर तेथे मिडल कट ठेवण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज सायंकाळी लोखंडी बॅरिकेट काढून मिडल कट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे डीपी रोड वरून येणाऱ्या वाहनांना थेट पलिकडच्या सर्विस रोडला जाणे सोपे होणार आहे. हे काम मार्गी लागल्याने कणकवली शहरवासीयांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा