सुधीर आडिवरेकर यांनी फोडला प्रचाराचा नारळ
सावंतवाडी :
प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी प्रचाराचा नारळ फोडला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रचारास सुरुवात केली.
श्री देव नरसोबा मंदिरात श्रीफळ वाढवून आपल्या प्रचाराचा त्यांनी शुभारंभ केला. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, महिला नगरसेवक पदाचे उमेदवार दुलारी रांगणेकर यांनीही प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, केतन आजगावकर, अमित गवंडळकर, किशोर चिटणीस, सचिन कुलकर्णी, सुदेश नेवगी, सुमित वाडकर, मया डुबळे, महेश बांदेकर, नागेश जगातप, साई परब, सुधीर मळीक आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
