तळकट गावचे सुपुत्र विजयकुमार मराठे यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा
दोडामार्ग
तळकट गावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले मा. श्री. विजयकुमार भिकाजी मराठे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दु:खद निधन झाले.
सामाजिक कामात सदैव आघाडीवर, प्रभावी वकृत्वशैली, ठाम भूमिका व स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वासाठी ते परिचित होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय व शेतकरी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.
ॐ शांती 🙏
