*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या सौ.मनिषा अभ्यंकर लिखित श्री ज्ञानदेव समाधि दिनानिमित्त अप्रतिम काव्यरचना*
ज्ञानदेवा
*ज्ञानदेवा तुम्ही यावे एकवार ।*
*पुन्हा अवतार घेवोनिया ॥१॥*
*दानपसावो जो तुम्ही मागितला ।*
*ईश्वरही झाला कबूल की ॥२॥*
*तयासी कित्येक जाहली शतके ।*
*वाट कवतिके पाहतसे ॥३॥*
*परी ना खळांची व्यंकटी सांडीली ।*
*सत्कर्मी वाढली नाही रती ॥४॥*
*दुरित-तिमिर समूळ ना गेला ।*
*नाही उगवला स्वधर्मार्क ॥५॥*
*तव बरोबरी अवतरतील ।*
*कल्पतरुबाग पीयूषाब्धि ॥६॥*
*चिंतामणी गांव संतसमुदाय*
*शीतल तो सूर्य भेटे लोकां ॥७॥*
*म्हणोनिया आता निढळावरी हात ।*
*वाट मी पाहात आहे देवा ॥८॥*
रचना – सौ. मनीषा अभ्यंकर
