You are currently viewing ज्ञानदेव

ज्ञानदेव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री देशकुलकर्णी लिखित अप्रतिम अभंग*

*ज्ञानदेव*

ज्ञानदेव माझा | ज्ञानाची माऊली
भक्तांना साऊली | पंथी जाता ||१||

जरी हिणविले | पोर संन्यासाचे
द्वार ते ज्ञानाचे | खुले केले ||२||

अगाध ते ज्ञान| गीता सोपी केली
प्राकृती आणली | भक्तां पायी ||३||

वदविले वेद | रेड्याच्या मुखाने
मांड्याचे भाजणे | मुक्ता साठी ||४||

चांगदेवा साठी | भिंत चालविली
ज्ञाने उद्धरिली | मती त्याची ||५||

अध्यात्म ज्ञानाचा | रचियेला पाया
शिणविली काया | ज्ञानियाने || ६||

संजीव समाधी | घेई ज्ञानदेव
जागृत तो भाव | आळंदीस ||७ ||

जयश्री देशकुलकर्णी
कोथरूड,पुणे -३८

प्रतिक्रिया व्यक्त करा