काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे विलास गावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू, असे प्रतिपादन त्यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अभय शिरसाट, तसेच श्रीनिवास गावडे, प्रकाश डिचोलकर, कृतिक कुबल, सतेज मयेकर, चेतन कुबल यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
