शहर भाजपच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत
सावंतवाडी
सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आगमन झाले असून, शहर भाजपच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती तथा नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक अँड परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, बंटी पुरोहित, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, परिणीती वर्तक आदी पदाधिकारी उपस्थित होते.