You are currently viewing फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा – रवी जाधव

फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा – रवी जाधव

फॅशन म्हणून निवडणूक लढवू नका तर जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा -रवी जाधव

सावंतवाडी

निवडणुका जाहीर झाल्या की इच्छुक उमेदवार हळूहळू बाहेर पडू लागतात जनतेशी गोड बोलून त्यांच्या हाता पाया पडू लागतात परंतु निवडून आल्यानंतर मात्र काही नगरसेवक जनतेच्या समस्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवतात ही वस्तुस्थिती आहे.
कोरोना काळातील मागील पाच वर्ष विकासापासून वंचित राहिलेली आपली सुंदरवाडी पुन्हा सुंदर बनवण्यासाठी व येथील जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी एक नगरसेवक म्हणून नाही तर आपण या समाजाचं काहीतरी देणे लागतो ह्या भावनेने आपण जर काम केलात तर तुमचं नगराध्यक्ष व नगरसेवक होणं एक सार्थकी ठरेल. जनतेला तुमच्याकडून फार काही मोठ्या अपेक्षा नसतात तर त्यांच्या काही किरकोळ अडचणी असतील त्याकडे थोडाफार लक्ष दिलात तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो पुढच्या वेळी जनतेच्या दारात जाऊन मत मागण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही.
आज ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांना मी भावी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी शुभेच्छा देतो निवडून आल्यानंतर त्यांनी शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तेचं संरक्षण करून शहराच्या विकासाबरोबरच येथील जनतेला, व्यापाऱ्यांना त्रास न देता सर्वांगीण विकास करून येथील जनतेशी कशा पद्धतीने गुण्यागोविंदाने नांदता येईल याचा जास्त विचार करावा एवढीच आपल्याकडून अपेक्षा.

प्रतिक्रिया व्यक्त करा