झोळंबे येथे २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
झोळंबे, ता. दोडामार्ग (सिंधुदुर्ग)
येथे वैकुंठवासी ह.भ.प. प.पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही “अखंड हरिनाम सप्ताह”ाचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय, झोळंबे यांच्या वतीने हा आठ दिवसीय धार्मिक सोहळा श्री पांडुरंग मंदिर येथे २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह – सस्नेह निमंत्रण
स्थान : श्री पांडुरंग मंदिर, झोळंबे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५
सप्ताहाचे वैशिष्ट्य
वैकुंठवासी ह.भ.प. प.पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या
संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय, झोळंबे यांच्या वतीने
मार्गशीर्ष शुक्ल ५ ते मार्गशीर्ष शुक्ल १२ या कालावधीत “अखंड हरिनाम सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे.
विशेष औचित्य
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे ७५० वे वर्ष
संत तुकाराम महाराज वैकुंठगमनाचे ३७५ वे वर्ष
या निमित्ताने दररोज सकाळी ०८.०० ते १२.०० : ज्ञानेश्वरी पारायण व महाप्रसाद
कार्यक्रम पत्रिका
पहिला दिवस – मंगळवार, २५/११/२०२५
सकाळी : महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण, महाप्रसाद
दुपारी :
वारकरी कीर्तन – ह.भ.प. प.पू. सद्गुरु वासुदेव (बाबी) महाराज वझे
प्रवचन – श्री. अनिल लाडोबा गवस
संध्याकाळी : हरीपाठ, दिंडी, दिवाकर भजन मंडळ दोडामार्ग
रात्री : दत्तप्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला, देवी माऊली वारकरी भजन मंडळ झोळंबे
दुसरा दिवस – बुधवार, २६/११/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी :
नारदीय कीर्तन – ह.भ.प. भालचंद्र सिध्दये (नानोडा गोवा)
तबला साथ – श्री. विठ्ठल मेस्त्री
भजन – सरस्वती संगीत विद्यालय खुटवळ पेडणे
संध्याकाळी :
हरीपाठ, दिंडी
भजन – गिरीष राष्ट्रोळी व अमरेश देसाई व सहकारी
रात्री : गजानन प्रासादिक भजन मंडळ विलवडे, देवी माऊली भजन मंडळ कोलझर
तिसरा दिवस – गुरुवार, २७/११/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी :
नारदीय कीर्तन – ह.भ.प. कु. भूमि योगेश आईर
प्रवचन – श्री. रामचंद्र भिकाजी गाड
संध्याकाळी : हरिपाठ, दिंडी, महादेव भजन मंडळ उगवे गोवा
रात्री : ग्रामस्थांचे भजन
चौथा दिवस – शुक्रवार, २८/११/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी :
वारकरी कीर्तन – श्री. दिपक पालयेकर
प्रवचन – श्री. रामचंद्र शेटकर
संध्याकाळी : सातेरी भजन मंडळ शिरंगे, स्वरसंगम भजन मंडळ तेरवण मेढे
रात्री : ग्रामस्थांचे भजन
पाचवा दिवस – शनिवार, २९/११/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी :
नारदीय कीर्तन – ह.भ.प. श्री. विठ्ठल गावस (केरी, गोवा)
तबला – श्री. देवेंद्र (बाळू) सुतार
प्रवचन – श्री. मनोहर माळकर
संध्याकाळी :
देवी माऊली कला मंडळ मेणकुरे
देवी राष्ट्रोळी कला भजन मंडळ धारगळ
रात्री : ग्रामस्थांचे भजन
सहावा दिवस – रविवार, ३०/११/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण
दुपारी :
नारदीय कीर्तन – ह.भ.प. श्री. भाऊ नाईक (वेतोरे-वेंजुर्ला)
तबला – कु. ललित (बिट्टू) कुंदेकर
भजन – स्वरानंद भजनी मंडळ वाफोली
संध्याकाळी : स्वरप्रभा संगीत साधना धुमासे
रात्री : विठ्ठल रखुमाई भजन मंडळ झोळंबे-दापटेवाडी, ग्रामस्थांचे भजन
सातवा दिवस – सोमवार, ०१/१२/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा, ज्ञानेश्वरी पारायण, फराळ
दुपारी : कीर्तन – ह.भ.प. प.पू. सद्गुरु वासुदेव (बाबी) महाराज वझे
सायं ६ वा. : सहस्त्र दीपोत्सव
संध्याकाळी : हरिपाठ, दिंडी, स्वरधारा भजन मंडळ दोडामार्ग
रात्री : ग्रामस्थांचे भजन
आठवा दिवस – मंगळवार, ०२/१२/२०२५
सकाळी : काकड आरती, महापुजा
सकाळी ८ ते १० : ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती
नंतर :
काल्याचे कीर्तन – श्री. जयानंद गोपाळ सावंत
दिंडी, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
अध्यक्ष, श्री पांडुरंग मंदिर, झोळंबे
अ. ५५७, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग
