You are currently viewing “पक्षीय नव्हे, स्वतंत्र चिन्हावर शहर विकास आघाडीची लढत 

“पक्षीय नव्हे, स्वतंत्र चिन्हावर शहर विकास आघाडीची लढत 

“पक्षीय नव्हे, स्वतंत्र चिन्हावर शहर विकास आघाडीची लढत

संदेश पारकरांचा आरएसएस व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा दावा”

कणकवली

कणकवली नगरपंचायतीची निवडणूक यंदा स्वतंत्र चिन्हावर लढविण्याचा निर्णय शहर विकास आघाडीने घेतला असून, या आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील भ्रष्टाचार, दहशतीचे राजकारण आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता कंटाळली असून अनेक पक्षांचे कार्यकर्ते तसेच आरएसएसशी संबंधित कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष तसेच सर्व १७ प्रभागांतील उमेदवार सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागील वेळेस तिरंगी लढतीमुळे अत्यल्प मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा प्रत्येक प्रभागातून एकच उमेदवार उभा राहावा यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे पारकर यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे अर्ज भरण्यास विलंब झाला असला तरी आता विविध पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी शहर विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्याचा दावा त्यांनी केला.

स्वतंत्र चिन्हावर एकजूट दाखवत निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदापासून पंधरा दिवसांची तात्पुरती दूर राहण्याची भूमिकाही घेतली आहे. आघाडीतील सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा