कणकवली :
कणकवली नगराध्यक्षपदी भाजपातर्फे समीर नलावडे यांनी आपल्या उमेदवारीचा अधिकृत अर्ज आज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षित देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, बंडू हर्णे, गावचे मानकरी सदानंद राणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राजू गवाणकर, अन्ना कोदे, संदीप नलावडे, ॲड. विराज भोसले, बंडू गांगण, मेघा गांगण, प्रणाम कामत, राजा पाटकर, महेश गुरव, सुरेश सावंत, अनिस नाईक, विशाल कामत, राज नलावडे, पंकज पेडणेकर, विराज राणे, वागदे सरपंच संदीप सावंत, संजय ठाकूर, गंगाधर सावंत, मनोज राणे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राजकीय घडामोडी रंगल्या होत्या. शेवटी समीर नलावडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून निश्चित करण्यात आले. अखेर समीर नलावडे यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करून प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांची ही नावे अंतिम टप्प्यात आली.

