You are currently viewing मालवणचा हापूस आंबा राज्यात अव्वल

मालवणचा हापूस आंबा राज्यात अव्वल

मालवणचा हापूस आंबा राज्यात अव्वल; कृषिमंत्र्यांकडून उत्तम फोंडेकर यांना अभिनंदनपत्र

मालवण :

मालवणातील उत्तम फोंडेकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी सातारा मार्केटला हापूस आंब्याची पेटी पाठविली होती. ही बाब माध्यमांद्वारे राज्याचे कृषिमंत्री भरणे साहेबांच्या लक्षात आली. वेगाने आणि उत्कृष्ट पद्धतीने माल पाठवल्याची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री भटणे साहेब यांनी फोंडेकर यांना अभिनंदनपत्र पाठवत विशेष कौतुक केले.

कृषिमंत्र्यांनी पाठविलेल्या पत्रातील मजकूरातून मालवण हापूस आंबा राज्यात अव्वल स्थानावर असल्याचे अधोरेखित होते. या संदर्भात माहिती देताना मालवण कृषी सहाय्यक किशोर कदम यांनी सांगितले की, कृषिमंत्र्यांकडून मिळालेली ही पावती म्हणजे मालवणच्या हापूस आंब्याच्या गुणवत्तेची दखल घेतलेली एक महत्त्वाची नोंद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा