You are currently viewing इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द…!!! असा मेसेज सोशल मीडियावर  होतोय व्हायरल….  मात्र हा  मेसेज खोटा असल्याचा सरकारचा दावा!!!!

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द…!!! असा मेसेज सोशल मीडियावर होतोय व्हायरल…. मात्र हा मेसेज खोटा असल्याचा सरकारचा दावा!!!!

नवीन शिक्षण धोरणानुसार आता केवळ इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीच बोर्ड परीक्षा असणार आहे आणि इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सरकारकडून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले आहे. पीआयबी फॅक्ट चेक या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

 

व्हाट्सअपवर अनेक मेसेंज व्हायरल होत असतात. अनेकजण त्यावर विश्वास ठेवून ते मेसेज फाॅरवर्ड करतात आणि समाजात गैरसमज पसरला जातो. सध्या असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा मेसेज व्हायरल होतोय –

 

‘कॅबिनेटने नवीन शिक्षण धोरणाला हिरवा झेंडा दाखवला आहे.

 

34 वर्षानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आला आहे. नवीन शिक्षण धोरणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे..

 

केवळ इयत्ता 12वीसाठीच बोर्ड असेल, इयत्ता दहावीचे बोर्ड रद्द करण्यात आले आहे. एमफील देखील बंद करण्यात आले आहे.

आता केवळ बारावीच्या विद्यार्थ्यांनाच बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. यापुर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांनाही बोर्डाची परीक्षा देणे बंधनकारक होते.

सरकारी, निमसरकारी, खासगी सर्व संस्थांसाठी हे नियम लागू असतील.

आदेशानुसार – (माननीय शिक्षण मंत्री, भारत सरकार)’

असा मेसेज व्हाट्सअपवर व्हायरल होत आहे. मात्र, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे, तसेच तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचल्यानंतर तो पुढे पाठवू नये. या व्हायरल मेसेजमधील माहिती पूर्णपणे खोटी आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

तुम्हालाही कोणत्या व्हायरल मेसेजविषयी शंका असल्यास तुम्ही केंद्र सरकारच्या पुढील माध्यमांवर संपर्क साधू शकता. 8799711259 या व्हाट्सअप नंबरवर संपर्क साधून तुम्ही कोणत्याही मेसेजची सत्यता पडताळू शकता. तसेच pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल पाठवून माहिती घेऊ शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा