विविध गटांसाठी आकर्षक पारितोषिके
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडीतर्फे कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे विषय आणि पारितोषिके –
▪️ नर्सरी ते सिनीअर केजी : रंगभरण स्पर्धा -पहिल्या तीन विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे.
▪️ इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी: रंगभरण स्पर्धा
– प्रथम पारितोषिक: ₹३०००
– द्वितीय पारितोषिक: ₹२०००
– तृतीय पारितोषिक: ₹१०००
▪️ इयत्ता ५ वी ते ७ वी : जत्रा
– प्रथम पारितोषिक: ₹३०००
– द्वितीय पारितोषिक: ₹२०००
– तृतीय पारितोषिक: ₹१०००
▪️ इयत्ता ८ वी ते १० वी : प्लास्टिक मुक्त पृथ्वी
– प्रथम पारितोषिक: ₹४०००
– द्वितीय पारितोषिक: ₹३०००
– तृतीय पारितोषिक: ₹२०००
▪️ खुल्या गटासाठी: दशावतार
– प्रथम पारितोषिक: ₹५०००
– द्वितीय पारितोषिक: ₹४०००
– तृतीय पारितोषिक: ₹३०००
▪️ स्पर्धा तारीख – १६ नोव्हेंबर २०२५, सकाळी ११ वाजता
स्थळ: बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट) फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा सावंतवाडी
▪️ नियम –
– विद्यार्थ्यांनी येताना चित्रकलेसाठी लागणारे साहित्य घेऊन यायचे आहे.उदा. रंग, ब्रश, ड्रॉइंग पॅड इत्यादी
– स्पर्धेसाठी लागणारा पेपर विद्यार्थ्यांना पुरवण्यात येईल.
– प्रवेश शुल्क ५० रुपये खाली दिलेल्या क्यू आर कोड ला जमा करायचे आहेत.
– १४ नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणी करायची आहे.
विजेत्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी: ०२३६३-२७५३६१, ९४०५८३०२८८, ९४२०२६०९०३

