You are currently viewing मालवणमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल

मालवणमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्तीप्रदर्शनाने उमेदवारीची सुरुवात!

मालवण :

मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुभारंभ केला. या वेळी शिवसेनेचे उमेदवार उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर यांनी प्रभाग क्र. २ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवणमधील या उमेदवारी दाखल कार्यक्रमामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा