You are currently viewing व्यसनमुक्तीचा संदेश देत सायकलवरून भारत भ्रमण — श्री धनाई साह यांचे ओसरगाव येथे स्वागत

व्यसनमुक्तीचा संदेश देत सायकलवरून भारत भ्रमण — श्री धनाई साह यांचे ओसरगाव येथे स्वागत

व्यसनमुक्तीचा संदेश देत सायकलवरून भारत भ्रमण — श्री धनाई साह यांचे ओसरगाव येथे स्वागत

ओसरगाव

बिहार राज्यातील छपरा येथील रहिवासी श्री धनाई साह हे गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण भारतभर सायकलवरून प्रवास करीत व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. “आरोग्य जपा, आई-वडिलांची सेवा करा आणि व्यसनापासून दूर राहा” हा त्यांचा भारत भ्रमणाचा मुख्य उद्देश आहे.

साठ वर्षीय धनाई साह यांना गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजता ओसरगाव तलावाजवळ पाहण्यात आले. त्यांच्या विचारपुशीनंतर त्यांनी आपल्या प्रवासाचा हेतू स्पष्ट केला. समाजात आरोग्यदायी व व्यसनमुक्त जीवनशैलीचा प्रसार व्हावा, यासाठी ते देशभर भ्रमंती करत आहेत.

त्यांचे ओसरगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले तसेच पुढील प्रवासासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. कन्याकुमारीच्या दिशेने मार्गस्थ होताना श्री धनाई साह यांनी “मेरा भारत महान” असा उद्गार काढत सर्वांना व्यसनमुक्त भारत घडविण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा