You are currently viewing वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन कुबल यांची उमेदवारी जाहीर

वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन कुबल यांची उमेदवारी जाहीर

नगरसेवक पदांसाठी नम्रता कुबल, स्वप्नील रावळ आणि वामन कांबळे यांची नावे निश्चित; वेंगुर्लेत पक्षाची बैठक पार

वेंगुर्ले :

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

वेंगुर्ले येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर करण्यात आले. तसेच नगरसेवक पदांसाठी माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, स्वप्नील रावळ आणि वामन कांबळे या तिन्ही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, इतर उमेदवारांची नावे लवकरच घोषित केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

माजी नगराध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल यांनी सांगितले की, “आगामी नगरपरिषद निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने उतरून जनतेचा विश्वास संपादन करेल. वेंगुर्लेच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा